आल्याची चटणी (Ginger Chutney)

आल्याची चटणी (Ginger Chutney)

आल्याची चटणी

साहित्य : 2 इंच आल्याचा तुकडा, 2 टेबलस्पून चणा डाळ, 2 टेबलस्पून उडीद डाळ, 2 टीस्पून धणे, पाऊण टीस्पून जिरं, लिंबाएवढ्या आकाराची चिंच, 4-5 हिरव्या मिरच्या, 3-5 सुक्या लाल मिरच्या, 1 टेबलस्पून गूळ, 3 टेबलस्पून तेल, स्वादानुसार मीठ.

कृती :
एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात चणा डाळ, उडीद डाळ, धणे, जिरं, लाल मिरच्या आणि हिरव्या मिरच्या तीन-चार मिनिटं मध्यम आचेवर परतवा. डाळ
सोनेरी रंगाची झाली की, त्यात आल्याचे तुकडे आणि चिंच घालून दोन-तीन मिनिटं परतवा. आच बंद करून मिश्रण थंड होऊ द्या. नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी, मीठ आणि गूळ घालून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्या.