आले पाक (Ginger Candy)

आले पाक (Ginger Candy)

आले पाक

साहित्य : 1 वाटी तासलेले आल्याचे तुकडे, 2 वाटी साखर, अर्धा वाटी सायीसकट दूध, 1 चमचा तूप.

कृती : आलं अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. एका ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये आल्याचं वाटण, साखर आणि दूध एकत्र करा आणि मध्यम आचेवर शिजत ठेवा. मिश्रण सतत ढवळत राहा. हळूहळू साखर विरघळून घट्ट होऊ लागेल. मिश्रण कडेपासून सुटू लागलं की, आच बंद करा आणि लगेच तुपाचा हात लावलेल्या ट्रेमध्ये घालून पसरवा. गरम सुरीने वड्या पाडा. मिश्रण थंड झाल्यावर वड्या वेगळ्या करा आणि हवाबंद डब्यात भरा.