गवार ढोकली (Gavar Dhokali)
गवार ढोकली (Gavar Dhokali)

By Shashikant Pawar in
गवार ढोकली
साहित्यः 1 कप गवार, 1 टीस्पून ओवा, चिमूटभर हिंग, 2 टीस्पून तेल.
ढोकलीः 1 कप मेथीची पाने, अर्धा कप बेसन, 1 कप गव्हाचे पीठ,3 टीस्पून तेल, मीठ चवीनुसार.
कृतीः ढोकलीचे सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्या. हे पीठ थोडा वेळ कपड्याने झाकून ठेवा. नंतर पिठाच्या गोल छोट्या वड्या तळून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करून ओवा व हिंग टाका. यात 2 कप पाणी टाका. पाणी उकळल्यानंतर गवार टाका. गवार अर्धी शिजल्यानंतर वड्या टाका. मीठ घालून मोठ्या आचेवर शिजवून घ्या. गरम-गरम पोळी व भातासोबत सर्व्ह करा.