चिकन विथ ब्लॅक पेपर (Gatari Special : Chicken W...

चिकन विथ ब्लॅक पेपर (Gatari Special : Chicken With Black Pepper)

चिकन विथ ब्लॅक पेपर


साहित्य : 4 चिकन लेग्स, अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून गरम मसाला, 2 टीस्पून काळी मिरी पूड, 1 टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट, 4 टेबलस्पून लिंबाचा रस, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून मोहरी, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :
चिकन लेग्स स्वच्छ धुऊन घ्या. हळद, लाल मिरची पूड, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ एकत्र करून, चिकन लेग्सना चोळा आणि किमान दोन तास फ्रीजमध्ये मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चिकनचे तुकडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत परतवा. नंतर पॅनमधून चिकन बाहेर काढून, त्याच तेलात मोहरी घाला. मोहरी तडतडली की, त्यात चिकन, लिंबाचा रस, काळी मिरी पूड आणि गरम मसाला घाला. मिश्रण चांगलं एकजीव करून चिकन पूर्णतः शिजू द्या. नंतर कोथिंबीर पसरवून गरमागरम चिकन
सर्व्ह करा.