लसणाची खिचडी (Garlic Khichadi)

लसणाची खिचडी (Garlic Khichadi)

लसणाची खिचडी

लसणाची खिचडी, Garlic Khichadi

साहित्य : 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी डाळ, 2 पातीच्या लसणाच्या जुड्या, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 5-6 संकेश्‍वरी मिरच्या, 5-6 काश्मिरी मिरच्या, 10-12 लसणाच्या पाकळ्या, फोडणीचं साहित्य, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, साजूक तूप.

कृती : लसणाची पात बारीक चिरून घ्या आणि लसूण ठेचून घ्या. एका तव्यावर तेल गरम करून त्यावर मिरच्या आणि लसूण परतवा. त्यात जिरं आणि मीठ घालून आचेवरून खाली उतरवा. हे मिश्रण मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. एका मोठ्या भांड्यात तूप गरम करा. त्यात कांदा घालून फोडणी करा. नंतर त्यात लसणीचं वाटण घालून परतवा. वाटणाला तेल सुटायला लागल्यावर त्यात धुतलेले डाळ आणि तांदूळ घालून परतवा. त्यात 4 ते 5 वाट्या गरम पाणी घालून, झाकण ठेवून खिचडी शिजू द्या. खिचडी साधारण शिजल्यावर त्यात मीठ आणि कोथिंबीर घाला. पुन्हा झाकण ठेवून खिचडी व्यवस्थित शिजवून घ्या. गरमागरम लसणाची खिचडी साजूक तूप घालून सर्व्ह करा.