गार्लिक चिकन (Garlic Chicken)

गार्लिक चिकन (Garlic Chicken)

गार्लिक चिकन

साहित्य : पाव किलो चिकन, अर्धा कप नारळाचं दूध, पाव टीस्पून हळद, 1 टीस्पून काळी मिरी पूड, अर्धा टीस्पून धणे पूड, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून मोहरी, 10 कडिपत्त्याची पानं, 3 टेबलस्पून तेल, 15-20 लहान कांदे (बेबी ऑनियन), 7-8 सुक्या लाल मिरच्या, 3-4 लसणाच्या पाकळ्या, 1 टेबलस्पून किसलेलं आलं.
कृती : चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे करून, ते स्वच्छ धुऊन निथळून घ्या. लहान कांदे आणि सुक्या लाल मिरच्या एकत्र पाणी न घालता बारीक वाटून
घ्या. आलं-लसूणही एकत्र पाणी न घालता बारीक वाटून घ्या.
एका जाड बुडाच्या भांड्यामध्ये तेल गरम करून, त्यात मोहरी व कडिपत्त्याची फोडणी करा. मोहरी तडतडली की, त्यात आलं-लसणाची पेस्ट घालून मंद आचेवर थोडा वेळ परतवा. नंतर त्यात कांदा-मिरचीची पेस्ट घालून अर्धा मिनिट परतवा. त्यात हळद आणि धणे पूड घालून थोडा वेळ परतवा. नंतर त्यात चिकन, काळी मिरी पूड आणि मीठ एकत्र करा. झाकण लावून 10 मिनिटं शिजवा. नंतर त्यात नारळाचं दूध आणि मीठ घाला. आवश्यकता असल्यास गरम पाणी घाला. झाकण लावून मंद आचेवर 10 ते 15 मिनिटं शिजवा. मध्ये मध्ये ते ढवळत राहा. गरमागरम चिकन गार्लिक कोथिंबीर घालून सर्व्ह करा.