गाजराचा हलवा (Gajar Halwa)

गाजराचा हलवा (Gajar Halwa)

गाजराचा हलवासाहित्य :
1 किलो गाजर, दीड लीटर दूध, 8 हिरव्या वेलच्या, 6-7 टेबलस्पून साजूक तूप, 6-7 टेबलस्पून साखर, 2 टेबलस्पून मनुका, 1 टेबलस्पून बदामाचे काप, 2 टेबलस्पून बारीक चिरलेले खजूर.

कृती :
गाजर तासून, स्वच्छ धुऊन किसून घ्या. गाजराच्या किसात दूध आणि वेलची घालून मध्यम आचेवर शिजवत ठेवा. अधूनमधून मिश्रण ढवळत राहा. मिश्रणातील
दूध पूर्णतः आटू द्या. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यात हे गाजराचं आटवलेलं मिश्रण घाला आणि मंद आचेवर 10-15 मिनिटं शिजू द्या. त्यात साखर एकत्र करून
हलव्याचा रंग गडद होईपर्यंत शिजवा. गाजराचा हलवा तयार झाला की त्यावर बदामाचे काप, मनुका आणि खजूर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.