ट्राइफल मॅडली (Fruits Special: Triffle Madly)

ट्राइफल मॅडली (Fruits Special: Triffle Madly)

ट्राइफल मॅडली

साहित्य : 1 पॅकेट स्लाइस केक, 1 कप मिश्र मौसमी फळं, थोडा स्ट्रॉबेरी क्रश, 1 कप दूध, दीड टेबलस्पून कस्टर्ड पावडर, 3 टेबलस्पून साखर.

कृती : दूध, कस्टर्ड पावडर आणि साखर यांचं एकजीव मिश्रण तयार करून ते मंद आचेवर गरम करत ठेवा. मिश्रणाला उकळी आली की, आच बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
आता एका सर्व्हिंग बाऊल, ग्लास किंवा जारमध्ये सर्वप्रथम थोडे केकचे स्लाइस पसरवा. त्यावर कस्टर्ड पावडरचं मिश्रण पसरवा. अशा प्रकारे आणखी एक थर लावा. शेवटी मिश्र फळांचे बारीक तुकडे आणि स्ट्रॉबेरी क्रश घालून सजवा आणि सर्व्ह करा.