फ्रुट सॅलेड (Fruit Salad)

फ्रुट सॅलेड (Fruit Salad)

फ्रुट सॅलेड

साहित्य : 1 सफरचंद, 1 केळं, पाव कप बिया नसलेली द्राक्षं, दीड कप कलिंगडाच्या फोडी किंवा पपई, पाव कप डाळिंबाचे दाणे, 1 कप संत्र्याच्या पाकळ्या, 1 कप अननसाचे तुकडे, अर्धा टीस्पून सैंधव मीठ, अर्धा टीस्पून जिरं पूड, अर्धा टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून काळी मिरी पावडर.

कृती :
सर्व फळं कापून एका बाऊलमध्ये एकत्र करा. त्यावर मिरपूड, जिरेपूड, सैंधव मीठ आणि चाट मसाला भुरभुरा आणि चांगलं मिक्स करा. भांड्याला झाकण लावून 2-3 तास थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार फळं खाण्यासाठी सर्व्ह करा.