फ्रेंच टोस्ट (French Toast)

फ्रेंच टोस्ट (French Toast)

 

साहित्य : 3 ब्रेड स्लाइसेस, 4 अंडी, तेल किंवा बटर आवश्यकतेनुसार, 2 टेबलस्पून दूध, 1 टेबलस्पून रेड चिली फ्लेक्स, मीठ चवीनुसार, कोथिंबीर चिरून, पाव टेबलस्पून मिरपूड, 1 चिरलेला कांदा, 2-3 हिरव्या मिरच्या चिरून.

कृती : मसाला फ्रेंच टोस्ट बनविण्यासाठी एका बाऊलमध्ये सर्व अंडी फेटून घ्या. त्यात दूध घालून चांगलं एकजीव होईपर्यंत ढवळा. नंतर रेड चिली फ्लेक्स, मिरपूड, मीठ घालून पुन्हा एकदा सर्व मिश्रण ढवळा. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. ब्रेडची एक स्लाइस अंड्याच्या मिश्रणामध्ये बुडवून पॅनवर शॅलो फ्रायसाठी ठेवा. त्यावर चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. त्यावर पुन्हा अंड्याचं मिश्रण चमच्याने घाला. आता ब्रेड परता आणि दुसरी बाजूही नीट शिजू द्या. त्याला तपकिरी रंग आला की पॅनवरून काढून डिशमध्ये सर्व्ह करा. अशा प्रकारे बनविण्यात आलेला मसाला फ्रेंच टोस्ट सकाळी न्याहारी करताना चहा किंवा कॉफीसोबत खाता येतो.