आम्रखंड (Festival Special : Aamrakhand)

आम्रखंड (Festival Special : Aamrakhand)

आम्रखंड

साहित्य : 1 हापूस आंबा, 300 ग्रॅम दही, 30 ग्रॅम साखर, 2 ग्रॅम वेलची पूड.

कृती : दही 8 ते 10 तास सुती कपड्यात बांधून लटकवून ठेवा. त्यातील पाणी पूर्णतः निघून जायला हवं. तयार झालेला हा चक्का एका वाडग्यामध्ये घेऊन, त्यात आंब्याचा रस आणि साखर घाला. मिश्रण एकत्र व्यवस्थित घोटून 15 मिनिटं साखर विरघळण्यासाठी तसंच ठेवून द्या. नंतर पुन्हा चांगलं घोटून घ्या. त्यात वेलची पूड आणि आवडीनुसार सुकामेव्याचे काप एकत्र करा. हे मिश्रण फ्रिजमध्ये थंड करण्यासाठी ठेवा. थंडगार आम्रखंड गरमागरम थेपल्यांसोबत सर्व्ह करा.