शेंगदाण्याचे रोल (Fasting Special : Peanuts Roll)

शेंगदाण्याचे रोल (Fasting Special : Peanuts Roll)

शेंगदाण्याचे रोल

साहित्य : 1 कप शेंगदाण्याचा कूट, 1 कप उकडून कुस्करलेले बटाटे, अर्धा कप उकडून कुस्करलेला सुरण, अर्धा कप आरारूट पूड, पाव कप बारीक चिरलेली पुदिन्याची पानं, 2 टीस्पून आलं-हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून साखर, स्वादानुसार सैंधव, तळण्यासाठी तेल.

कृती : 1 टीस्पून शेंगदाण्याचं कूट, बटाटे, सुरण, आलं-हिरवी मिरची पेस्ट, पुदिना, मीठ, साखर आणि 1 टीस्पून आरारूट पूड यांचं एकजीव मिश्रण तयार करून, चांगलं मळून घ्या. या मिश्रणाचे रोल तयार करून ठेवा. उर्वरित आरारूटमध्ये 2 टीस्पून पाणी एकत्र करून मिश्रण तयार करून ठेवा. एका थाळीत उर्वरित शेंगदाण्याची कूट पसरवून ठेवा. आता रोल सर्वप्रथम आरारूटच्या मिश्रणात घोळून, नंतर शेंगदाण्याच्या कुटामध्ये घोळवा आणि गरमागरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्या.