फ्रूट श्रीखंड (Fasting Special: Fruit Shrikhand)

फ्रूट श्रीखंड (Fasting Special: Fruit Shrikhand)

फ्रूट श्रीखंड

Fruit Shrikhand

साहित्य :
2 लीटर घट्ट मलईयुक्त दही, 1 कप पिठीसाखर, अडीच कप मिश्र फळांचे बारीक तुकडे (संत्रं, सफरचंद, चिकू, डाळिंब).
कृती : एका भांड्यात चाळण ठेवून त्यात दही घाला आणि हे भांडं आठ ते दहा तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यानंतर हे दही अन्य भांड्यात काढून, त्यात साखर घाला आणि हँड ब्लेंडरने व्यवस्थित घुसळून घ्या. आता त्यात फळांचे तुकडे मिसळा आणि पुन्हा सेट होण्यासाठी तासभर फ्रीजमध्ये ठेवून द्या. फ्रूट श्रीखंड थंडगार सर्व्ह करा.