फराळी उसळ (Fasting Special : Farali Usal)

फराळी उसळ (Fasting Special : Farali Usal)

फराळी उसळ


साहित्य : पाव कप शेंगदाणे, पाव कप खोवलेलं ओलं खोबरं, पाव कप कोथिंबीर चिरलेली, 2 टीस्पून तेल, 1 टीस्पून जिरं, पाऊण कप उकडलेला बटाटा, पाऊण टीस्पून लाल मिरची पावडर, स्वादानुसार सैंधव मीठ, 4 टेबलस्पून तयार बटाट्याचा फराळी चिवडा.

कृती : शेंगदाणे, खोबरं आणि कोथिंबीर एकत्र करून अंदाजे 4 टेबलस्पून पाणी घेऊन मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. नंतर एका पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जिरं घाला, ते तडतडलं की त्यात बटाटा घालून थोडं हलवा. त्यात शेंगदाणा व खोबर्‍याची पेस्ट घाला. नीट ढवळा व थोडा वेळ शिजू द्या. नंतर त्यात लाल मिरची पावडर, मीठ, दीड कप गरम पाणी घाला. चांगलं उकळू द्या. 6-8 मिनिटांनी गॅस बंद करा. बाऊलमध्ये थोडी मिसळ काढा त्यावर फराळी चिवडा घालून लगेच सर्व्ह करा.