शिंगाड्याची बर्फी (Fasting Special Barfi)

शिंगाड्याची बर्फी (Fasting Special Barfi)

शिंगाड्याची बर्फीसाहित्य :
  100 ग्रॅम शिंगाड्याचं पीठ, 100 ग्रॅम तूप, 150 ग्रॅम साखर, 250 मिलिलीटर पाणी, 1 टीस्पून वेलची पूड, 8-10 भाजलेले बदाम, थोडे भाजलेले मगज (खरबुजाच्या बिया)
व बदामाचे लहान तुकडे.

कृती :  शिंगाड्याचं पीठ सोनेरी होईपर्यंत तुपावर परतवून घ्या. त्यात थोडं पाणी एकत्र करा. नंतर त्यात साखर, वेलची पूड आणि मगज एकत्र करा. मिश्रणातील पाणी आटेपर्यंत सतत ढवळत मिश्रण शिजू द्या. आता त्यात बदामाचे तुकडे घालून एकत्र करा आणि मिश्रण आचेवरून खाली उतरवा. एक ताटाला किंवा ट्रेला तुपाचा हात लावून, त्यात हे मिश्रण घाला आणि समान पसरवून घ्या. मिश्रण साधारण थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडा. शिंगाड्याच्या बर्फीवर मगज व बदामाचे तुकडे घालून सजवा
आणि सर्व्ह करा.