केळ्याचे कबाब (Fasting Special: Banana Kabab)

केळ्याचे कबाब (Fasting Special: Banana Kabab)

केळ्याचे कबाब

साहित्य : 250 ग्रॅम कच्ची केळी (सोलून चौकोनी आकारात कापून घ्या), 1 मोठी वेलची, पाव कप शिंगाड्याचं पीठ, 2 टीस्पून सैंधव मीठ, 2 टीस्पून धनेपूड (भाजलेले धणे),अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, 2 टीस्पून लिंबाचा रस, 1 हिरवी मिरची चिरून, 2 टेबलस्पून कोथिंबीर चिरलेली, तळण्यासाठी तेल किंवा तूप.

कृती :
कच्ची केळी सोलून त्याचे चौकोनी तुकडे करून घ्या. नंतर हे केळ्याचे तुकडे, आलं आणि वेलची पाणी गरम करून त्यात वाफवून घ्या. नंतर ते थंड होऊ द्या. थंड झाल्यावर केळी स्मॅश करून घ्या. त्यात शिंगाड्याचं पीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर घालून एकत्र करा. शेवटी हिरवी मिरची घाला. आता या सर्व मिश्रणाचा कणकेसारखा गोळा बनवा. त्याचे मध्यम आकाराचे गोल बनवून त्यास कबाबचा आकार द्या. नंतर मंद आचेवर पॅनमध्ये हे कबाब दोन्ही बाजूने तुपामध्ये खरपूस शेकून घ्या. एका टिश्यू पेपरवर ते काढा आणि गरमगरम सर्व्ह करा.