उपवास स्पेशल : बदामी खीर (Fasting Special : Alm...

उपवास स्पेशल : बदामी खीर (Fasting Special : Almonds Kheer)

बदामी खीर


साहित्य : 50 ग्रॅम बदाम (भिजवून, उकळून साल काढलेले), 200 मिलिलीटर दूध, पाव टीस्पून केशर, 4-5 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क, सजावटीसाठी काजू-बदामाचे पातळ काप.

कृती :
सोललेल्या बदामामध्ये थोडं दूध घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. आता उर्वरित दुधामध्ये ही बदामाची पेस्ट, कंडेन्स्ड मिल्क आणि केशर घालून एकजीव मिश्रण तयार करा. हे मिश्रण तीन ते चार तासांसाठी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. थंडगार बदामी खीर काजू-बदामाचे काप घालून सजवा आणि सर्व्ह करा.