उपवासी इडली (Fasting Idli)

उपवासी इडली (Fasting Idli)

उपवासी इडलीसाहित्य :
1 वाटी साबुदाणा, 1 वाटी वरई तांदूळ, 3 टीस्पून लोणी, 1 टीस्पून जिरं, स्वादानुसार मीठ.

कृती : साबुदाणा आणि वरई तांदूळ तीन तासांकरिता वेगवेगळे पाण्यात भिजवून ठेवा. नंतर चाळणीवर निथळून घ्या. दोन्ही एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. या पिठात जिरं, मीठ आणि थोडं पाणी घालून एकजीव करा. इडलीप्रमाणे पीठ तयार करा. इडली पात्राला तेल लावून त्यात हे पीठ घाला. कुकरमध्ये साधारण 10 मिनिटांसाठी वाफवा. गरमागरम इडली आमसुली किंवा चिंचुकीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.