फराळी डोनट्स (Fasting Donuts)

फराळी डोनट्स (Fasting Donuts)

फराळी डोनट्स

साहित्य : 100 ग्रॅम राजगिर्‍याचं पीठ, 100 ग्रॅम वरीचं पीठ, 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून बारीक वाटलेली साखर, चिमूटभर सैंधव, चिमूटभर खायचा सोडा,
2 टेबलस्पून तूप (मोहनासाठी), तळण्यासाठी तूप, गार्निशिंगसाठी थोडी बारीक वाटलेली साखर.

कृती :
राजगिरा आणि वरीचं पीठ, दही, वाटलेली साखर, तुपाचं मोहन, सोडा आणि आवश्यकतेनुसार पाणी एकत्र करून कणीक मळून घ्या. ही कणीक अर्ध्या तासासाठी कपडा घालून झाकून ठेवा. नंतर कणकेच्या मोठ्या लाट्या घेऊन डोनट कटरने डोनट तयार करून घ्या. कढईमध्ये तूप गरम करून त्यात हे डोनट्स सोनेरी रंगावर तळून घ्या. गरमागरम डोनट्सवर थोडी पिठीसाखर भुरभुरून सर्व्ह करा.