फजेता पुलाव (Fajeta Pulav With Mango Juice)

फजेता पुलाव (Fajeta Pulav With Mango Juice)

फजेता पुलाव

साहित्य : पुलावासाठी : 100 ग्रॅम बासमती तांदूळ, 15 ग्रॅम साजूक तूप, 2 ग्रॅम तेजपत्ता, 1 लवंग, 1 दालचिनीचा तुकडा, 1 ग्रॅम जिरं, 2 ग्रॅम मीठ, 5 पुदिन्याची पानं, 1 ग्रॅम कोथिंबीर.

फजेता कढीसाठी : 1 हापूस आंबा, 2 ग्रॅम मीठ, 50 ग्रॅम दही, 1 ग्रॅम जिरं, 1 ग्रॅम मोहरी, 1 दालचिनीचा तुकडा, 1 लवंग, 2 बोरी मिरच्या, 4 कडिपत्ते, अर्धा ग्रॅम हळद, अर्धा ग्रॅम हिंग, 1 ग्रॅम तूप, 1 ग्रॅम हिरवी मिरची, 2 ग्रॅम मीठ, चवीनुसार साखर.

कृती : बासमती तांदूळ पाण्यात लवंग, दालचिनी आणि मीठ घालून शिजवून घ्या. भात शिजला की, त्यात तूप, जिरं, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर एकत्र करून घ्या. एका पॅनमध्ये तूप थोडं गरम करून, त्यात मोहरी, जिरं, दालचिनी, लवंग, मेथीदाणे, कडिपत्ता, बोरी मिरची, हिंग आणि हळद घालून फोडणी तयार करा. दही आणि हापूस आंब्याचा रस एकत्र करून त्यावर ही फोडणी घाला. वरून हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घाला. त्यात साखर आणि मीठ एकत्र करून एक उकळी येऊ द्या आणि नंतर आच बंद करा. गरमागरम फजेता कढीसोबत पुलाव सर्व्ह करा.