अंडा कढी (Eggs Curry)

अंडा कढी (Eggs Curry)

अंडा कढी

साहित्य : 6 उकडून सोललेली अंडी, 2 कांदे, 1 इंच आलं, पाव टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून चिंचेचा कोळ, पाव कप तेल, 1 टीस्पून मोहरी, 1 टीस्पून काळी मिरी, मीठ चवीनुसार, 4 टोमॅटो, 4 हिरव्या मिरच्या, पाऊण टीस्पून हळद, दीड टीस्पून धणेपूड, कडिपत्त्याची पानं, 1 तुकडा दालचिनी, 100मिलिलीटर नारळाचं दूध, सजावटीसाठी कोथिंबीर.

कृती : मध्यम आचेवर एक मोठं भांड ठेवून त्यात तेल गरम होऊ द्या. मोहरी घाला. ती तडतडली की त्यात चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात दालचिनी आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. 1 मिनिट ढवळा मग त्यात टोमॅटो घालून 10 मिनिटं शिजू द्या. नंतर त्यामध्ये आलं, हळद, लाल मिरची पावडर, धणेपूड घाला व परतून घ्या. मिश्रणाला तेल सुटू लागलं की त्यात चिंचेचा कोळ आणि पाणी घालून 2 मिनिटं शिजू द्या. नंतर त्यात नारळाचं दूध, चवीनुसार मीठ आणि कडिपत्ता घाला. चांगलं ढवळा. उकळी आली की त्यात उकडलेली अंडी घाला नि 3-5 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. थोड्या वेळाने गॅस बंद करा. त्यावर कोथिंबीर भुरभुरा. आवडत असल्यास कडिपत्त्याची पानं तळून, कुस्करून त्यावर घाला. भात तसेच डोशांसोबतही ही अंडा कढी खाता येते.