एग कबाब (Egg Kebab)

एग कबाब (Egg Kebab)

साहित्य : 4 अंडी (उकडा आणि किसून घ्या.), 1 कच्चं अंडं फेटलेलं,1 टेबलस्पून बेसन, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून कोथिंबीर, 1 टेबलस्पून पुदिन्याची पानं (सर्व बारीक चिरून), अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि तळण्यासाठी तेल.
कृती : सर्व साहित्य एकत्र करून त्याचा नरम गोळा बनवा. नंतर त्याचे छोटे छोटे कबाब बनवून गरम तेलात तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या.