केशर-वेलची श्रीखंड (Dussehra Special : Kesar S...

केशर-वेलची श्रीखंड (Dussehra Special : Kesar Shrikhand)

केशर-वेलची श्रीखंड


साहित्य : अर्धा किलो दह्याचा चक्का, अर्धा किलो पिठीसाखर, 4-5 वेलदोड्यांची पूड, पाव वाटी जायफळ पूड, थोडं केशर, 2 टेबलस्पून दूध, 5 ग्रॅम चारोळ्या,
5 ग्रॅम बदाम-पिस्त्याचे काप.
कृती : चक्का आणि साखर एकत्र करून पुरणयंत्रातून काढून घ्या किंवा चाळणीतून गाळून घ्या. नंतर त्यात दूध घालून मिश्रण घोटून घ्या. मिश्रण फार घट्ट वाटल्यास त्यात आणखी थोडं दूध घाला. नंतर त्यात वेलदोड्यांची व जायफळाची पूड, केशर व थोडा केशरी रंग घालून चांगलं घोटून घ्या. हे मिश्रण तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. श्रीखंड वाढताना त्यावर चारोळ्या आणि बदाम-पिस्त्याचे काप घाला.
टीप :
हे श्रीखंड साधारण पांढर्‍या रंगाचं होईल. रंगीत श्रीखंड हवं असल्यास हव्या त्या खायच्या रंगाचा वापर करून, हव्या त्या रंगाचं श्रीखंड तयार करता येईल.
श्रीखंड फसफसू नये म्हणून, आधी केवळ चक्का चांगला फेटा. साखरेत ती भिजेल एवढं दूध घालून, साखर अर्धवट विरघळवून घ्या. यात फेटलेला चक्का घालून मिश्रण एकत्र करा.
श्रीखंड आंबट झाल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात विरघळून घाला. आंबटपणा
निघून जातो.