आम्रखंडाचा गोडवा (Dussehara Special : Aamrakha...

आम्रखंडाचा गोडवा (Dussehara Special : Aamrakhanda)

आम्रखंड
साहित्य : 1 लीटर दूध, दीड वाटी साखर, 1 वाटी आमरस, 1 टीस्पून दही, थोड्या आंब्याच्या बारीक चिरलेल्या फोडी.
कृती : दुधाचं दही आणि दह्याचा चक्का तयार करून घ्या. हा चक्का एका भांड्यात काढून त्यात साखर घालून चांगलं फेटून घ्या. हे मिश्रण दोन तासांकरिता तसंच ठेवून द्या. नंतर त्यात आमरस घालून सर्व मिश्रण एकत्र पुरण यंत्रातून फिरवा. यामध्ये आंब्याच्या फोडी घालून साधारण एकत्र करून घ्या. हे मिश्रण तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. श्रीखंड वाढतानाही वरून काही आंब्याच्या फोडी घाला.
टीप :
– आमरसाच्या गोडीप्रमाणे साखर कमी-जास्त करा.
दह्याचा चक्का कसा तयार कराल?
श्रीखंडाची गोडी दह्याच्या चक्का कसा आहे, यावर अवलंबून असते. असा हा चक्का तयार करण्यासाठी दही रात्रभर पातळ कपड्यात बांधून लटकवून ठेवा. सकाळी गाठोडं थोडे पिळून त्यातील पाणी पूर्णतः निथळून घ्या, म्हणजे कापडात केवळ दह्याचा चक्का शिल्लक राहील. उत्तम चक्का तयार करण्यासाठी दही ताजं (आंबट नाही) घ्या. असं दही घरच्या घरी तयार करण्यासाठी दूध कोमट करून त्यात दह्याचं विरजण लावा आणि सहा ते आठ तास उष्ण जागी ठेवून द्या. छान दही तयार होतं.
टीप :
–   चक्का आंबट असल्यास साखरेचं प्रमाण वाढवा.
–   चक्का घट्ट असायला हवा, कारण पिठीसाखरेला पाणी सुटतं.

Aamrakhanda, आम्रखंड