दम का मूर्ग (Dum Kaa Murg)

दम का मूर्ग (Dum Kaa Murg)

दम का मूर्ग

साहित्य : अर्धा किलो चिकन लेग्स, पाव टीस्पून सुंठ पूड, 2 काजू, 4 बदाम रात्रभर भिजवलेले, अर्धा कप खोबरं, अर्धा टेबलस्पून तूप, पाव टीस्पून लसणाची पेस्ट, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा इंच दालचिनीची काडी, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, 1 वेलची, 1 टेबलस्पून तेल, अर्धा कप टोमॅटो प्युरी, अर्धा टीस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून चारोळी, अर्धा कप दही, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून गरम मसाला पूड, थोडी बारीक चिरलेली पुदिन्याची पानं.
कृती : जाड बुडाच्या भांड्यात काजू, चारोळी, खसखस, खोबरं भाजून घ्या. बदामाची सालं काढून, ते आणि भाजलेलं मिश्रण (थंड करून) बारीक वाटा. गरज भासल्यास थोडं पाणी घाला. या मिश्रणात चिकनचे तुकडे घालून 30 मिनिटं मॅरिनेट करत ठेवा. जाड बुडाच्या भांड्यात मध्यम आचेवर तूप गरम करा. त्यात कांदा सोनेरी रंगावर परतवा. कांदा बाजूला काढून, त्याच भांड्यात तेल घालून खोबर्‍याची पेस्ट, वेलची, दालचिनी परतवून घ्या. मिश्रणाला तेल सुटलं की, त्यात भाजलेला कांदा, हिरव्या मिरच्या, मिरची पूड, दही, टोमॅटो प्युरी व मीठ मिसळा. मिश्रण एकजीव करून 4-5 मिनिटं परतवा. त्यात चिकन, काळी मिरी पूड, गरम मसाला, कोथिंबीर-पुदिना घाला. मिश्रण एकजीव करून, चिकन पूर्णतः शिजू द्या. गरमागरम दम का मूर्ग लिंबाचा रस घालून सर्व्ह करा.