ड्रायफ्रुट मोदक (Dry fruit Modak)

ड्रायफ्रुट मोदक (Dry fruit Modak)

साहित्य : दीड कप बी नसलेले खजूर, पाव कप बदाम, पाव कप काजू, पाव कप अक्रोड, पाव कप मनुका, पाव कप सुक्या खोबर्‍याचा कीस, 2 टेबलस्पून खसखस, 1 टीस्पून साजूक तूप.
कृती : बदाम, काजू, अक्रोड आणि खजूर बारीक चिरून घ्या. बदाम, काजू आणि अक्रोड अगदी मंद आचेवर वेगवेगळे 1-2 मिनिटं परतवून घ्या. सुक्या खोबर्‍याचा कीस हलका तपकिरी होईस्तोवर मंद आचेवर परतवा आणि बाजूला काढून ठेवा. त्याच पॅनमध्ये खसखस परतवून घ्या. आता या पॅनमध्ये तूप गरम करून त्यात खजूर आणि मनुका घालून सतत ढवळत परतवा. साधारण 4-5 मिनिटात त्यांचं एकजीव दाट मिश्रण तयार होईल. त्यानंतर आच बंद करून, मिश्रण थोडं थंड होऊ द्या. भाजलेले काजू, बदाम, अक्रोड, खोबरं आणि खसखस मिक्सरमधून एकत्र जाडसर वाटून, बाजूला ठेवून द्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर आणि मनुका घालून जाडसर वाटून घ्या. आता काजू-बदाम आणि खजूर मनुक्याचं मिश्रण एकत्र करून पुन्हा पॅनमध्ये गरम करत ठेवा. मंद आचेवर हे मिश्रण 2-3 मिनिटं सतत ढवळत परतवा. मिश्रण थोडं चिकट होऊन एकत्र गोळा तयार होईल. हे मिश्रण एका परातीमध्ये काढून थोडं थंड होऊ द्या. नंतर या मिश्रणाचे लहान गोळे करून ग्रीस केलेल्या मोदकाच्या साच्यामध्ये गच्च भरा आणि मोदक तयार करा.