राजगिरा लाडू (Digestive Rajgira Ladoo)

राजगिरा लाडू (Digestive Rajgira Ladoo)

राजगिरा लाडू

साहित्य : अडीच वाटी राजगिर्‍याच्या लाह्या, 1 वाटी किसलेला गूळ, 5 चमचे तूप, स्वादानुसार वेलची-जायफळ पूड.
कृती : गुळामध्ये थोडं पाणी घालून तो पॅनमध्ये गरम करत ठेवा. गूळ चांगला वितळल्यावर त्यात वेलची-जायफळची पूड आणि राजगिर्‍याच्या लाह्या घाला. मिश्रण चांगलं एकजीव करून आच बंद करा. मिश्रण कोमट असतानाच हाताला तूप लावून लाडू वळा.