क्रिमी चॉकलेटी सॅलेड आणि पनीर स्प्राऊट सॅलेड (D...

क्रिमी चॉकलेटी सॅलेड आणि पनीर स्प्राऊट सॅलेड (Different Type Of Salads)

क्रिमी चॉकलेटी सॅलेड

Type Of Salads

साहित्य : 2 वाट्या आंबा, चिकू व कलिंगडाच्या फोडी, पाव वाटी चॉकलेट सॉस, अर्धा वाटी दूध, 1 चमचा साखर, 1 वाटी पनीरचे काप, चमचाभर दुधाचा मसाला.
कृती : चॉकलेट सॉस व दूध एकत्र फेटून, डीप फ्रीज करा. सेट झाल्यावर पुन्हा ब्लेंड करा, म्हणजे सॉफ्ट आइस्क्रीम बेस तयार होईल. आता एका काचेच्या ट्रेमध्ये फळं पसरवा. त्यावर साखर आणि दुधाचा मसाला घाला. त्यावर क्रीमचा एक थर द्या. त्यावर पनीरचे काप पसरवून, वरून उरलेलं क्रीम घाला. हा ट्रे तासभर डीप फ्रीज करा.

पनीर स्प्राऊट सॅलेड

Type Of Salads

साहित्य : 1 वाटी जाडसर किसलेलं पनीर, पाव वाटी अंकुरीत मूग, पाव वाटी अंकुरीत मटकी, पाव वाटी अंकुरीत चणे, पाव वाटी अंकुरीत वाटाणे, 2 चमचे लिंबाचा रस, 2 चमचे हिरवं तिखट, 4 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार सैंधव.
कृती : कडधान्यं एकत्रित कुकरमधून साधारण वाफवून घ्या. कडधान्यातील पाणी व्यवस्थित निथळून घ्या. एका बाऊलमध्ये पनीर, लिंबाचा रस, तिखट आणि सैंधव एकत्र करा. त्यात कोथिंबीर घालून, हे मिश्रण कडधान्यामध्ये एकत्र करा. मिश्रण एकजीव करून सर्व्ह करा.

चायनीज भजी (Monsoon Special : Chinese Bhajiya)