गुळांबा (Different Sweet Recipe Of Raw Mango)

गुळांबा (Different Sweet Recipe Of Raw Mango)

गुळांबासाहित्य :
1 वाटी कैरीचा कीस, 3 वाटी किसलेला गूळ, 3-4 लवंगा, 1 लहान तुकडा दालचिनी, स्वादानुसार वेलची पूड.

कृती :
एका स्टील किंवा नॉनस्टिकच्या कढईत तूप गरम करून, त्यात लवंगा आणि दालचिनी परतवा. त्यात कैरीचा कीस घालून एक वाफ काढा. नंतर त्यात गूळ मिसळा. मिश्रण चांगलं एकजीव करून व्यवस्थित शिजू द्या. शेवटी त्यात वेलची पूड मिसळून आच बंद करा. गुळांबा थंड करून सर्व्ह करा.

टीप : गुळाचं प्रमाण कैरीच्या आंबटपणानुसार कमी-जास्त करा.