ब्रेड रसमलई (Different Rasmalai Recipe)

ब्रेड रसमलई (Different Rasmalai Recipe)

ब्रेड रसमलई, Different Rasmalai Recipe
साहित्य : 10 ब्रेड स्लाइस, 2 लीटर दूध, 4 बर्फी 1 कप साखर, 4 टेबलस्पून तूप, सजावटीसाठी बदाम व पिस्ता, चिमूटभर केशर, चांदीचा वर्ख, गुलाबाच्या पाकळ्या.
कृती : वाटीच्या साहाय्याने ब्रेडचे लहान लहान गोल तुकडे करून घ्या. अर्धा कप साखरेचा पाक तयार करून घ्या. दूध आटेपर्यंत उकळवून घ्या. त्यात बर्फी आणि उर्वरित साखर घालून उकळवा. तवा गरम करून त्यावर ब्रेडचे तुकडे तूप लावून व्यवस्थित शेकून घ्या. नंतर हे ब्रेडचे तुकडे साखरेच्या पाकात बुडवून बाहेर काढा. उर्वरित पाक रसमलईच्या मिश्रणात मिसळा. आता ब्रेडचे तुकडे रसमलईत घाला. त्यावर बदाम, पिस्ता आणि केशर भुरभुरा. त्यावर चांदीचा वर्ख आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवा आणि सर्व्ह करा.

पनीर फ्रुट सॅलड (Special Sweet Paneer Recipe)