मनुका लाडू, गूळ पापडीचे लाडू (Different Flavour...

मनुका लाडू, गूळ पापडीचे लाडू (Different Flavour Laadu Recipes)

मनुका लाडू


साहित्य : 1 वाटी मनुका, अर्धा वाटी भरडलेले काजू, 2 चमचे दूध पावडर, 2 चमचे दाणेदार बारीक साखर किंवा 3 चमचे पिठीसाखर.
कृती : मनुका स्वच्छ धुऊन घ्या. मनुका ओलसर असतानाच मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. त्यात साखर, काजूची भरड आणि दुधाची पूड मिसळून, चांगलं एकजीव करा. या मिश्रणाचे लाडू वळून घ्या.

गूळ पापडीचे लाडू


साहित्य : 1 वाटी तूप, अर्धा वाटी पोहे, 2 वाट्या कणीक, पाव वाटी भाजलेलं खोबरं, 1 चमचा भाजलेली खसखस, 1 चमचा वेलची पूड, दीड वाटी किसलेला गूळ, 1 वाटी खोबर्‍याचा कीस.
कृती : कढईत तूप गरम करून, त्यात पोहे तळून बाजूला ठेवा. उरलेल्या तुपात कणीक मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजा. तळलेले पोहे, भाजलेलं खोबरं, भाजलेली खसखस आणि वेलची पूड एकत्र करून हाताने कुस्करून मिसळा. नंतर त्यात भाजलेलं कणीक आणि किसलेला गूळ घालून मिश्रण एकजीव करा. या मिश्रणाचे नेहमीप्रमाणे लाडू वळून खोबर्‍याच्या किसात घोळवा आणि सर्व्ह करा.