पोह्यांची फिरनी (Different Flavor Phirni)

पोह्यांची फिरनी (Different Flavor Phirni)

पोह्यांची फिरनी (Different Flavor Phirni)
साहित्य : पाऊण कप पोहे, 3 कप दूध, 3 टेबलस्पून साखर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, 1 कप सुकामेव्याचे बारीक तुकडे, सजावटीसाठी 2 टेबलस्पून बदाम भिजवून सोललेले.
कृती : कॉर्नफ्लोअर 2 टीस्पून दुधात मिसळून ठेवा. पोहे मंद आचेवर दोन मिनिटं कुरकुरीत होईपर्यंत परतवा. नंतर मिक्सरमधून बारीक वाटून पूड करून घ्या. जाड बुडाच्या भांड्यात दूध उकळत ठेवा. थोडा वेळ उकळल्यानंतर त्यात साखर आणि पोह्यांची पूड मिसळून चार-पाच मिनिटं उकळवा. नंतर त्यात कॉर्नफ्लोअरचं मिश्रण मिसळून सतत ढवळत दोन-तीन मिनिटं उकळवा. नंतर आचेवरून उतरवून थंड होऊ द्या. मिश्रण पूर्णतः थंड झाल्यानंतर तासाभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. तासाभरानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये तळाला सर्वप्रथम सुकामेव्याचे तुकडे पसरवा आणि त्यावर फिरनी घाला. वर बदाम लावून सजवा आणि थंडगार पोह्यांची फिरनी सर्व्ह करा.

पनीर मालपोहा (Special Sweet Paneer Recipe)