चिकू पराठा (Different Flavor Chikoo Paratha)

चिकू पराठा (Different Flavor Chikoo Paratha)

चिकू पराठा

चिकू पराठा, Chikoo Paratha
साहित्य : 1 वाटी चिकूचा गर, 1 वाटी पनीर, पाव वाटी पिठीसाखर, 2 वाट्या मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि तूप.
कृती : चिकूचा गर, पनीर आणि साखर एकत्र मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करा.
मैदा, तांदळाचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून, थोड्या पाण्यात घट्ट मळून घ्या. कणीक तासभर तसंच झाकून ठेवा. नंतर त्याच्या लहान-लहान पार्‍या करा आणि त्यात चिकूचं मिश्रण भरून जाडसर पराठे लाटा. हे पराठे तुपावर खरपूस होईपर्यंत भाजा.

पोह्यांची फिरनी (Different Flavor Phirni)