कॉर्न पनीर सॅलेड आणि कॉर्न-मिक्स व्हेजिटेबल सॅल...

कॉर्न पनीर सॅलेड आणि कॉर्न-मिक्स व्हेजिटेबल सॅलेड (Different Corn Salads)

कॉर्न पनीर सॅलेड

साहित्य : 200 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे, 150 ग्रॅम पनीर, 150 ग्रॅम उभा पातळ चिरलेला कोबी, 1 उभी पातळ चिरलेली सिमला मिरची, 1 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : कोबी गरम पाण्यात मीठ घालून उकळून घ्या. एका पॅनमध्ये बटर गरम करून सिमला मिरची परतवा. मिरची थोडी नरम झाल्यावर आचेवरून उतरवा आणि त्यात उरलेलं साहित्य एकत्र करून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.

कॉर्न-मिक्स व्हेजिटेबल सॅलेड

साहित्य : पाव कप उकडलेले मक्याचे दाणे, 1 कप उकडून बारीक चिरलेल्या मिश्र भाज्या, पाव कप उकडून बारीक चिरलेले बटाटे, 2 टेबलस्पून बारीक चिरलेला कांदा, 2 कप ताज घट्ट दही, स्वादानुसार मीठ, 1 टीस्पून तेल, चिमूटभर मोहरी, 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची, काही कडिपत्त्याची पानं, स्वादानुसार लाल मिरची पूड व जिरे पूड, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कडिपत्ता, हिरवी मिरची, कांदा, बटाटे, उकडलेल्या भाज्या आणि मक्याचे दाणे घालून परता. दही फेटून त्यात मीठ एकत्र करा. परतलेलं मक्याचं मिश्रण दह्यात एकत्र करा. सर्व्ह करताना त्यावर लाल मिरची पूड, जिरे पूड आणि कोथिंबीर पसरवा.