चिकू पराठा आणि स्टफ चिकू (Different Chikoo Reci...

चिकू पराठा आणि स्टफ चिकू (Different Chikoo Recipes)

चिकू पराठा

चिकू पराठा आणि स्टफ चिकू, Different Chikoo Recipes

साहित्य : 1 वाटी चिकूचा गर, 1 वाटी पनीर, पाव वाटी पिठीसाखर, 2 वाट्या मैदा, 1 वाटी तांदळाचं पीठ, चिमूटभर मीठ आणि तूप.
कृती : चिकूचा गर, पनीर आणि साखर एकत्र मळून घ्या. या मिश्रणाचे लहान-लहान गोळे करा. मैदा, तांदळाचं पीठ आणि मीठ एकत्र चाळून, थोड्या पाण्यात घट्ट मळून घ्या. कणीक तासभर तसंच झाकून ठेवा. नंतर त्याच्या लहान-लहान पार्‍या करा आणि त्यात चिकूचं मिश्रण भरून जाडसर पराठे लाटा. हे पराठे तुपावर खरपूस होईपर्यंत भाजा.

स्टफ चिकू

चिकू पराठा आणि स्टफ चिकू, Different Chikoo Recipes

साहित्य : 6 चिकू, 1 वाटी कलिंगडाचे काप, थोडं क्रीम, 6 टुथपिक, नारळाचा चव आणि पिठीसाखर.
कृती : चिकू धुऊन कोरडे करा. कलिंगड व क्रीम एकत्र कुस्करून घ्या. चिकूला एका बाजूने चिर देऊन, त्यातील बिया काढून टाका. आता त्यात हलक्या हाताने क्रीम भरा. पिठीसाखर आणि नारळाचा चव एकत्र करून त्यात चिकू घोळवून घ्या. हे स्टफ चिकू तासभर फ्रीजमध्ये ठेवा. सर्व्ह करताना टुथपिक लावून सर्व्ह करा.