डेट अँड नट्स शेक (Date And Nuts Shake)

डेट अँड नट्स शेक (Date And Nuts Shake)

डेट अँड नट्स शेक

साहित्य : 6 खजूर (बिया काढलेले), 4 गोड बिस्किटं (आवडीनुसार), स्वादानुसार साखर, 1 स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, 4 भाजलेले बदाम, 4 भाजलेले काजू, 1 कप दूध, सजावटीसाठी ब्राऊन शुगर.
कृती : अर्धा कप पाण्यात खजूर अर्ध्या तासाकरिता भिजत ठेवा. भिजवलेले खजूर, बिस्किटं, साखर, व्हॅनिला आइस्क्रीम आणि दूध ब्लेंडरमध्ये एकत्र ब्लेंड करून घ्या. हे मिश्रण लगेच सर्व्हिंग ग्लासमध्ये घाला. त्यावर काजू-बदाम आणि ब्राऊन शुगर घालून सजवा आणि सर्व्ह करा.