थालीपीठ (Crispy Snack : Thalipeeth)
थालीपीठ (Crispy Snack : Thalipeeth)

साहित्य: 1 कप गव्हाचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप तांदळाचं पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा कप पोहे, 1 इंच आल्याचा तुकडा, 4 हिरव्या मिरच्या, 2 टीस्पून धणे पूड, 1 टीस्पून जिरं पूड, 1 टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून ओवा, 2 टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून हळद, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप बारीक चिरलेले कांदे, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून तीळ, आवश्यकतेनुसार तेल.
कृती : पोहे भिजवून घ्या. आलं आणि मिरच्या एकत्र बारीक वाटून घ्या. गव्हाचं, ज्वारीचं व तांदळाचं पीठ आणि बेसन एकत्र चाळून घ्या. त्यात तेल आणि तीळ सोडून उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या. आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट पीठ मळा आणि 20-25 मिनिटांकरिता झाकून बाजूला ठेवून द्या. आता अॅल्युमिनियम फॉइलवर पाण्याचा हात लावून त्यावर या पिठाचे लहान लहान थालीपीठ थापा. त्यावर तीळ भुरभुरून हाताने अलगद दाबा. नंतर थालीपिठाच्या मध्यभागी छिद्र करा. गरम तेलावर थोडं तेल पसरवून त्यावर अलगद थालीपीठ ठेवा. थालीपीठ दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. गरमागरम थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करा.