तांदळाच्या कुरकुरीत पुर्‍या (Crispy Rice Puri)

तांदळाच्या कुरकुरीत पुर्‍या (Crispy Rice Puri)

तांदळाच्या कुरकुरीत पुर्‍या

साहित्य : 1 कप तांदळाचं पीठ, 2-3 टेबलस्पून मैदा, 2 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून कसुरी मेथी, अर्धा टीस्पून जिरं, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम तांदळाचं पीठ मळून घ्यायचं. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 कप पाणी गरम करत ठेवा. त्यात जिरं, 1 टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ घालून भांड्यावर झाकण ठेवून ते उकळू द्या. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि 1 कप तांदळाचं पीठ त्यात घाला ते पीठ पाण्यात चांगलं ढवळा आणि झाकण लावून 5 मिनिटं ठेवा. पाच मिनिटांनंतर पीठ थोडंसं फुगलेलं दिसेल. आता त्यात कसुरी मेथी, लाल मिरची पावडर आणि तेल घालून चांगलं मळून घ्या. नंतर तयार पीठाचे पुरीसाठी गोळे बनवा. पुर्‍या लाटून घ्या आणि कढईमध्ये तेल गरम करून मध्यम आचेवर पुर्‍या तळून घ्या. तांदळाचं पीठ लवकर सुकतं तेव्हा पीठ गरम असतानाच पुर्‍या लाटा. तयार पुर्‍या गरमगरमच खा. चहासोबत वा टोमॅटो सॉससोबतही खाता येतात.