क्रिस्पी पोटॅटो कॉर्न पकोडा आणि बेक्ड गार्लिक प...

क्रिस्पी पोटॅटो कॉर्न पकोडा आणि बेक्ड गार्लिक पोटॅटोज (Crispy Potato Corn Pakoda And Baked Garlic Potato)

क्रिस्पी पोटॅटो कॉर्न पकोडा

साहित्य : दीड कप उकडलेले मक्याचे दाणे, 1 कप उकडून कुस्करलेला बटाटा, अर्धा कप किसलेलं प्रोसेस्ड चीझ, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार मीठ, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, तळण्यासाठी तेल.

कृती :
तेल सोडून उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या. कढईत ते गरम करून त्यात मध्यम आकाराचे पकोडे अलगद सोडा. पकोडे मंद आचेवर सोनेरी रंगाचे कुरकुरीत होईपर्यंत तळा. गरमागरम क्रिस्पी पोटॅटो कॉर्न पकोडे हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.

बेक्ड गार्लिक पोटॅटोज

साहित्य : 3 बटाटे चौकोनी तुकडे केलेले, पाव कप ऑलिव्ह ऑईल, स्वादानुसार मीठ, स्वादानुसार काळी मिरी पूड, 7-8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, 2 टेबलस्पून पार्सलेची पानं कुस्करलेली.

कृती :
ओव्हन 400 डिग्री फेरेनाइटवर प्रीहिट करा. एका वाडग्यामध्ये बटाटे, ऑलिव्ह ऑईल, मीठ, काळी मिरी पूड आणि लसूण चांगलं एकजीव करून घ्या. बेकिंग ट्रेमध्ये बेकिंग शीट लावून त्यावर बटाट्याचं मिश्रण पसरवा. हा ट्रे प्रीहिटेड ओव्हनमध्ये 45 ते 50 मिनिटं बेक करा. मध्ये एक-दोनदा ओव्हनमधून बाहेर काढून परतून घ्या. सोनेरी रंगाचे आणि कुरकुरीत झाल्यावर ओव्हनमधून बाहेर काढा. त्यावर पार्सले पानं घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.