खस्ता पनीर (Crispy Paneer Recipe)

खस्ता पनीर (Crispy Paneer Recipe)

खस्ता पनीर (Crispy Paneer Recipe)

खस्ता पनीर, Crispy Paneer Recipe

साहित्य :
100 ग्रॅम पनीरचे चौकोनी तुकडे, 4 पापडांचा चुरा, 4 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या), 25 ग्रॅम काश्मिरी लाल मिरची पूड, 50 ग्रॅम कॉर्नफ्लोअर, 100 ग्रॅम आलं-लसूण पेस्ट, 20 ग्रॅम बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 ग्रॅम चिली फ्लेक्स, स्वादानुसार मीठ, तळण्याकरिता तेल.

कृती : पापडाच्या चुर्‍यामध्ये चिली फ्लेक्स एकत्र करून घ्या. एका बाऊलमध्ये हिरवी मिरची, मीठ, आलं-लसूण पेस्ट, काश्मिरी लाल मिरची पूड, कॉर्नफ्लोअर आणि कोथिंबीर एकत्र करा. या मिश्रणात पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता हे पनीरचे तुकडे पापडाच्या चुर्‍यामध्ये घोळून गरम तेलामध्ये तळून घ्या. गरमागरम खस्ता पनीर टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.