क्रिस्पी गार्लिक पोटॅटो (Crispy Garlic Potato)

क्रिस्पी गार्लिक पोटॅटो (Crispy Garlic Potato)

क्रिस्पी गार्लिक पोटॅटो

साहित्य: 2 मोठे बटाटे, 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोर, चिमूटभर अजीनोमोटो, मीठ व काळी मिरी पूड चवीनुसार, तळण्यासाठी तेल, 1 टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, 1 टेबलस्पून बारीक चिरलेले आलं, अर्धा कप टोमॅटो सॉस, सजावटीसाठी कांद्याची पात.

कृती: बटाटे सोलून त्याचे काप करून घ्या. कांद्याची पात चिरून घ्या. बटाटे मिठाच्या पाण्यात 5-7 मिनिटे उकडून घ्या. पाणी गाळून बटाटे वेगळे ठेवा. कॉर्नफ्लोर, मीठ, काळी मिरी व अजीनोमोटो एकत्र करा. यात बटाट्याचे काप मिक्स करून तळून घ्या. एक टेबलस्पून तेलात कांदा, लसूण, आलं व मीठ टाकून मोठ्या आचेवर परता. टोमॅटो सॉस टाका. बटाट्याचे काप मिक्स करा. गरम-गरम सर्व्ह करा.