क्रिस्पी बनाना फ्राय (Crispy Banana Recipe)

क्रिस्पी बनाना फ्राय (Crispy Banana Recipe)

क्रिस्पी बनाना फ्राय

क्रिस्पी बनाना फ्राय, Crispy Banana Recipe
साहित्य : 5 कच्ची केळी, 1 चमचा बटर, 1 भोपळी मिरची, 1 चमचा लसणीचा ठेचा, 1 चमचा लाल तिखट, मीठ आणि फोडणीचं साहित्य, तेल.
कृती : केळीची सालं तासून घ्या. नंतर त्याचे दोन भाग करून, उभे पातळ काप करा. केळीच्या कापांना थोडं मीठ आणि अर्धा चमचा लिंबूरस लावून झाकून ठेवा. भोपळी मिरचीही तशीच चिरा. एका पॅनमध्ये बटर करून मोहरी व हिांगची फोडणी द्या. त्यात लाल तिखट आणि ठेचा परतवा. हे केळ्याचे काप घालावे. थोडेसे मीठ घालून परतावे. वरून मिरचीची काप घालून मंद गॅसवर पाट मिनिटे परतावं. झाकण ठेवू नये. झाकण ठेवल्यास केळी क्रिस्पी होत नाहीत.

बेबीकॉर्न पनीर मसाला (Baby Corn Paneer Masala)