अप्पम (Crispy Appam)

अप्पम (Crispy Appam)

अप्पम

साहित्य : 1 कप चणा डाळ, एक तृतीयांश कप रवा, पाव कप दही, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला, एक तृतीयांश कप खोवलेलं खोबरं, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, अर्धा टीस्पून खायचा सोडा, स्वादानुसार मीठ, पाव कप बारीक चिरलेले काजू, आवश्यकतेनुसार तेल.

कृती : चणा डाळ सहा तास भिजत ठेवा. नंतर बारीक वाटून घ्या. आता तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य चांगलं एकजीव करून घ्या. अप्पमच्या साच्याला आतून थोडं तेल चोळून घ्या. आता यात अप्पमचं मिश्रण भरून, ते दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या. गरमागरम अप्पम खोबर्‍याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
टीप : अप्पमचा साचा नसल्यास मिश्रणाचे लहान लहान गोळे गरम तेलात सोडून भजी तळून घ्या.