मलई मालपोहा ( Creamy Maalpoha)

मलई मालपोहा ( Creamy Maalpoha)

मलई मालपोहा – Creamy Maalpoha

Creamy Maalpoha

साहित्य : मालपोहा तयार करण्यासाठी
: 1 कप मैदा, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, 2 टेबलस्पून दही, 2 टेबलस्पून दुधाची पूड, अर्धा कप दूध, आवश्यकतेनुसार पाणी,
सजावटीसाठी चांदीचा वर्ख.

साखरेचा पाक तयार करण्यासाठी : 1 कप साखर, अर्धा कप पाणी, 1 टीस्पून केशर, अर्धा टीस्पून वेलची पूड, चिमूटभर खायचा पिवळा रंग.
सारणासाठी : पाव कप घट्ट मलई, 200 ग्रॅम मावा, अर्धा कप पिठीसाखर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा कप बदाम-पिस्त्याचे काप, अर्धा टीस्पून वेलची पूड.

कृती : मालपोह्यासाठीचं चांदीचा वर्ख सोडून उर्वरित सर्व साहित्य एका वाडग्यामध्ये घेऊन चांगलं एकजीव करून घ्या. मऊ मिश्रण तयार व्हायला हवं. हे मिश्रण बाजूला ठेवून द्या. पाक तयार करण्यासाठी साखर आणि पाणी एकत्र करून जाड बुडाच्या भांड्यात आठ ते दहा मिनिटं उकळत ठेवा. वेगळ्या भांड्यात सारणासाठीचं सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून मंद आचेवर दोन-तीन मिनिटं शिजवा. मिश्रण दाट व्हायला हवं. या मिश्रणाचे समान आकाराचे भाग करून बाजूला ठेवून द्या. आता नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर मालपोह्याचं मिश्रण पसरवा. लहानसा मालपोहा थोडं तूप पसरवून दोन्ही बाजूने भाजून घ्या आणि बाजूला ठेवून द्या. प्रत्येक मालपोहा दोन मिनिटांसाठी साखरेच्या पाकात बुडवा. आता एका ताटामध्ये काही मालपोहे ठेवा. प्रत्येक मालपोह्यावर सारणाचं थोडं मिश्रण ठेवून, त्याची गुंडाळी करा. मालपोह्याचे हे
रोल मायक्रोवेव्ह-प्रूफ सर्व्हिंग डिशमध्ये सजवून, त्यावर उर्वरित साखरेचा पाक पसरवा. मालपोहा सर्व्ह करण्यापूर्वी दोन-तीन मिनिटांसाठी मायक्रोवेव्हमध्ये गरम करा.
गरमागरम मालपोहा चांदीचा वर्ख लावून सजवा आणि सर्व्ह करा.