चीझ कॉर्न टिक्की आणि ग्रिल्ड कॉर्न टोस्ट (Corn ...

चीझ कॉर्न टिक्की आणि ग्रिल्ड कॉर्न टोस्ट (Corn Tikki And Toast)

चीझ कॉर्न टिक्की

साहित्य : 100 ग्रॅम उकडून जाडसर वाटलेले स्वीट कॉर्न, 2 टेबलस्पून किसलेलं शेडर चीझ, 50 ग्रॅम किसलेलं पनीर, 1 टीस्पून जिरे पूड, 1 टीस्पून कॉर्नफ्लोअर, पाव टीस्पून वेलची पूड, पाव टीस्पून गरम मसाला पूड, स्वादानुसार मीठ, 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल.

कृती : तेलाव्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्याचं एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाच्या मध्यम आकाराच्या टिक्क्या बनवून गरम तेलात तळून घ्या. गरमागरम चीझ कॉर्न टिक्की पुदिन्याच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

ग्रिल्ड कॉर्न टोस्ट

साहित्य : 1 कप उकडलेले मक्याचे दाणे, 8 ब्रेड स्लाइस, 1 बारीक चिरलेली सिमला मिरची, 2 कप किसलेलं चीज, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 बारीक चिरलेला कांदा, 2 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, स्वादानुसार काळी मिरी पूड व मीठ, 1 टीस्पून बटर, 1 टीस्पून टोमॅटो केचप.

कृती : एका पॅनमध्ये बटर गरम करून, त्यात ब्रेड स्लाइस व्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घाला आणि परतून घ्या. ब्रेड स्लाइस एका बाजूने टोस्ट करून घ्या आणि उलट करून त्यावर मक्याचं तयार केलेलं मिश्रण पसरवा. त्यावर ब्रेडची दुसरी स्लाइस ठेवा. गरमागरम ग्रिल्ड कॉर्न टोस्टचे लहान तुकडे करून टोमॅटो केचपसोबत सर्व्ह करा.