कॉर्न स्टफ पराठा (Corn Stuffed Paratha)

कॉर्न स्टफ पराठा (Corn Stuffed Paratha)

कॉर्न स्टफ पराठा

साहित्य : अर्धा कप जाडसर वाटलेले मक्याचे दाणे, पाव कप किसलेलं पनीर, 1 उकडून कुस्करलेला बटाटा, 1 टेबलस्पून तेल, 1 टीस्पून बेसन, 1 टीस्पून लाल मिरची पूड, 1 टीस्पून चाट मसाला, पाव टीस्पून गरम मसाला, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 कप गव्हाचं पीठ, 2 टेबलस्पून मैदा, स्वादानुसार मीठ, 1 टेबलस्पून तेल, गरजेनुसार पाणी.

कृती :
सर्वप्रथम गव्हाचं पीठ, मैदा, मीठ, तेल आणि गरजेनुसार पाणी घेऊन कणीक मळून घ्या. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मक्याचे दाणे, बटाटा, हिरवी मिरची, पनीर, बेसन, सर्व मसाले, मीठ आणि कोथिंबीर घालून शिजवा. मिश्रण थंड झाल्यावर पिठाचे गोळे बनवून त्यात हे सारण भरा आणि पराठे लाटून घ्या. गरम तव्यावर पराठे तूप लावून खरपूस भाजा. गरमागरम कॉर्न स्टफ पराठा चटणी आणि सॉससोबत सर्व्ह करा.