कॉर्न सॅण्डविच (Corn Sandwich)

कॉर्न सॅण्डविच (Corn Sandwich)

कॉर्न सॅण्डविच

साहित्य : अर्धा कप उकडलेले मक्याचे दाणे, 12 ब्राउन ब्रेडचे स्लाइस, 1 टेबलस्पून किसलेलं चीझ, चिमूटभर काळी मिरी पूड, 1 टीस्पून लाल मिरची पूड, पाव कप बारीक चिरलेली सिमला मिरची, पाव कप बारीक चिरलेला टोमॅटो, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, 1 टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, 6 टीस्पून टोमॅटो केचप, स्वादानुसार मीठ, बटर.

कृती : ब्रेडच्या सर्व स्लाइसेसवर बटर लावा. एका पॅनमध्ये थोडं बटर वितळवून, त्यावर कांदा परतवून घ्या. त्यात टोमॅटो केचप व्यतिरिक्त उर्वरित सर्व साहित्य घालून परतवा व आचेवरून खाली उतरवा. आता एका ब्रेड स्लाइसवर केचप पसरवून त्यावर मक्याचं मिश्रण पसरवा. त्यावर दुसरा ब्रेडचा स्लाइस ठेवा. अशा प्रकारे सर्व सॅण्डविच तयार करा. हे सॅण्डविच त्रिकोणी तुकड्यांमध्ये कापून हिरवी चटणी व टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करा.