कॉर्न पॅटिस (Corn Pattice)

कॉर्न पॅटिस (Corn Pattice)

कॉर्न पॅटिस

साहित्य : 2 कप उकडलेले स्वीट कॉर्न (अमेरिकन मक्याचे दाणे), 3 उकडलेले बटाटे, 2 ब्रेडचे स्लाइस, 1 टीस्पून किसलेलं आलं, 3 हिरव्या मिरच्यांची पेस्ट, 2 लहान कांदे, अर्धा टीस्पून जिरे, पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव कप जाडसर भरड केलेले कॉर्नफ्लेक्स, 1 टेबलस्पून मैदा, अर्धा कप पाणी, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती : बटाटे सोलून कुस्करून घ्या. ब्रेडचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक वाटा आणि ते बटाट्यात एकत्र करा. कांदे बारीक चिरून घ्या. दीड कप मक्याचे दाणे मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या. ही मक्याची भरड आणि उरलेले अर्धा कप अख्खे मक्याचे दाणे बटाट्याच्या मिश्रणामध्ये एकत्र करा. त्यात चिरलेला कांदा, मिरचीची पेस्ट, आलं, जिरे, कोथिंबीर आणि मीठ एकत्र करून एकजीव मिश्रण तयार करा. या मिश्रणाचे 18 ते 20 मध्यम आकाराचे गोलाकार-चपटे पॅटिस बनवा. कॉर्नफ्लेक्सचा चुरा एका ताटलीत पसरवून ठेवा. मैदा आणि पाणी यांचं एकजीव मिश्रण तयार करून घ्या. या मिश्रणात पॅटिस बुडवून लगेच बाहेर काढा आणि कॉर्नफ्लेक्समध्ये घोळवा. पॅटिसला सर्व बाजूने कॉर्नफ्लेक्स चिकटतील, याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे सर्व पॅटिस तयार करून अर्धा ते पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवा. पॅटिस एकावर एक न रचता, वेगवेगळे ठेवा. पॅटिस फ्रीजमधून बाहेर काढून, 10 मिनिटं बाहेर
ठेवा आणि नंतर गरम तेलात मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्या. तळलेले पॅटिस टिश्यू पेपरवर काढा, म्हणजे जास्तीचं तेल निघून जाईल. गरमागरम कॉर्न पॅटिस पुदिना चटणी किंवा टोमॅटो केचपबरोबर सर्व्ह करा.