कॉर्न पनीर सॅलेड (Corn Paneer Salad)

कॉर्न पनीर सॅलेड (Corn Paneer Salad)

कॉर्न पनीर सॅलेड

साहित्य : 200 ग्रॅम उकडलेले मक्याचे दाणे, 150 ग्रॅम पनीर, 150 ग्रॅम उभा पातळ चिरलेला कोबी, 1 उभी पातळ चिरलेली सिमला मिरची, 1 टेबलस्पून बटर, 1 टेबलस्पून लिंबाचा रस, अर्धा टीस्पून काळी मिरी पूड, सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती :
कोबी गरम पाण्यात मीठ घालून उकळून घ्या. एका पॅनमध्ये बटर गरम करून सिमला मिरची परतवा. मिरची थोडी नरम झाल्यावर आचेवरून उतरवा आणि त्यात उरलेलं साहित्य एकत्र करून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करा.