कॉर्न-मूग डाळ कचोरी (Corn Moong Daal Kachori)

कॉर्न-मूग डाळ कचोरी (Corn Moong Daal Kachori)

कॉर्न-मूग डाळ कचोरी

साहित्य : 100 ग्रॅम रवा, 100 ग्रॅम स्वीट कॉर्न्स, 100 ग्रॅम भिजवलेली मूग डाळ, 250 ग्रॅम मैदा, 1 टेबलस्पून लाल मिरची पूड, 1 टेबलस्पून धणे पूड, 2 टीस्पून बडीशेप पूड, 2 टीस्पून आमचूर पूड, चिमूटभर हिंग, 1 टीस्पून गरम मसाला पूड, पाव टीस्पून हळद, स्वादानुसार मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा, रवा, चिमूटभर मीठ, 50 मिलिलीटर तेल आणि आवश्यकतेनुसार कोमट पाणी एकत्र करून मऊ कणीक मळून घ्या. हे कणीक अर्ध्या तासासाठी झाकून बाजूला ठेवून द्या. भिजवलेल्या मूग डाळीमधील पाणी निथळून, ती बारीक वाटून घ्या. मक्याचे दाणे थोडं पाणी घालून जाडसर वाटून घ्या. एका पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यात हिंग, मूग डाळीचं वाटण, मक्याचं वाटण, सर्व सुके मसाले आणि थोडंसं मीठ घालून मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत परतवा. नंतर आच बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.
कणीक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्या. कणकेची पुरी लाटून त्यात सारण भरा आणि कचोरी तयार करा. ही कचोरी गरम तेलात सोनेरी रंगावर खरपूस तळून घ्या. गरमागरम कॉर्न-मूग डाळ कचोरी आंबट-गोड चटणीसोबत सर्व्ह करा.